Simple Short Meyo Sandwich
नवीन दप्तर 🎒, नवीन टिफिन, नवीन वॉटरबॅग, नवीन वर्ग🏫, नवीन टीचर👩 नवीन पुस्तक 📕📖📚आणि नवीन पुस्तकांचा तो धुंद करणारा सुगंध.
सगळं सगळं पुन्हा अनुभवतेय मी माझ्या मुलाच्या रुपात. त्यालासुद्धा खूप आवडतो नवीन पुस्तकांचा सुवास अगदी माझ्याच सारखा.
" अगं चिमे आवरलं का तुझं ? भरलं का सगळं दप्तर वेळापत्रकानुसार? बंड्या उठ रे बाबा आता सुट्ट्या संम्पल्या शाळा सुरु झाली आजपासून."
"अहो तुम्ही पण आटपा बरं आंघोळ करा लवकर. पोरांना शाळेत नेऊन सोडायचयं आपल्याला. व्हॅन वाला शाळेतून घरी आणून सोडणार आहे मग त्यांना. आणि तो ओला टॉवेल बेडवर नका बरं टाकू 😣"
"ए आईssss मला पहिल्याच दिवशी पोळी भाजी नकोय टिफिन मध्ये, चटपटीत दे काहीतरी , " असे काहीसे सुखद संवादिक भांडण साधारण सर्वच घरांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी दिसून येते.
माझं घर पण या सगळ्या गोष्टींना अजिबात अपवाद नाहीये.
आमच्या बाहुबली ला आज शाळेच्या पहिल्या दिवशी टिफिन मध्ये स्वतः बनवलेले सँडविच न्यायचे होते. मग पठ्ठयानी अलार्म न लावता व मी न उठवता 7 वाजता जागा होऊन अगदी उत्साहाने सगळी तयारी केली आणि सँडविच बनवले.
म्हणाला," मी सगळ्यांना share करणार आहे आणि टीचर ला पण सांगणार माझ्या सुपर आई नी शिकवलं आहे मला. आणि सुट्टीत मी फायरलेस cooking शिकला म्हणून".
" सुपर आई" हे मात्र नवीनच होत मला. मी विचारलं, "सुपर आई", का बर म्हणाला ?तर म्हणतो कसा," तुला सगळं माहित आहे मला आणि बाबाला तू सगळ्या questions ची answers देते न आम्ही विचारलेल्या म्हणून तू सुपर आई".
पाणी आलं हो डोळ्यात . खरच तर बोलला तो प्रत्येक लेकरासाठी त्याची आई सुपर आईच असते.
निघतांना न सांगता देवाला नमस्कार केला आणि चांगली बुद्धी दे म्हणाला . छान वाटलं, "पोरग सुधारल", म्हणाले हे 😂
गेलो मग शाळेत सोडायला. वाटलं होतं रडेल😢 म्हणून मग मी समजूत घालेल 😊 पण झालं उलटंच सगळी पाखरे किलबिलाट करून एकमेकांना भेटली. रडारड नाही की गोंधळ नाही आणि चक्क हात हलवून हसत हसत 😃बाय बाय✋ करत गेले पण वर्गात.
मी आपली आ वासून बघतच राहिली . खरच आहे आजकालची पिढी खूपच हुशार ( चांगल्या अर्थाने )आणि प्रॅक्टिकल आहे.
नाहीतर मी किती गोंधळ घातला होता शाळेत जातांना बापरे जणू मी सावत्र मुलगी आहे आणि आई बाबा मला कैदखान्यात नेत आहे असेच वाटले होते तेव्हा.
असो झालं पुन्हा रुटीन सुरु ....☺ तुमच्या साठी माझ्या बाहुबली नि बनवलेलं सँडविच पाठवतेय🙏
- साहित्य :
ब्राऊन ब्रेड ४, मेयॉनीज, टमाटा १, कांदा १, चीझ स्लाइस २, टोमॅटो सॉस २ चमचे, काकडी १ गोल कापून. लेट्युस ची पाने २, पिझ्झा स्पाईस मिक्स १ चमचा
- कृती :
ब्राऊन ब्रेड चे चार स्लाइस घेऊन त्याला तुमच्या आवडीचे मेयॉनीज लावून घ्या. त्यावर पिझ्झा स्पाईस मिक्स टाका. कांदा, टमाटा, काकडी आणि आवडत असल्यास लेट्युस ची पाने पसरवून घ्या. त्यावर टोमॅटो सॉस टाकून वरून चीझ स्लाइसचे तुकडे ठेवा आणि एकमेकांवर पूर्ण तयार ब्रेड ठेऊन खायला द्या.