कुरकुरीत ढोकळा काप
साहित्य:
ढोकळ्याचे तुकडे २ वाटी, मोहरी १ चमचा, कोथिंबीर सजावटीसाठी, किसलेले ओल खोबर २ चमचे, पिठी साखर १ छोटा चमचा, तेल १ वाटी आवश्यकतेनुसार, गोडलिंबाची ७ ते ८ कोवळी पाने.
कृती:
ढोकळा पीठ नेहमीसारखे साधारण घट्टसर भिजवावे आणि इडलीपात्रात १५ मिनिटे इडलीसारखे वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर इडलीपात्रातून गोल गोल आकाराचे काढून घ्यावे. नंतर १ गोल कापाचे ४ तुकडे याप्रमाणे तुकडे करून बाजूला काढून ठेवा.
कढईत १ वाटी तेल गरम करून त्यात मोहरी आणि गोडलिंबाची पाने टाकून तडतडू द्या. थंड झालेले ढोकळ्याचे काप त्यात कुरकुरीत होईपर्यंत शॉलो फ्राय करा. त्यावर पिठी साखर भुरभुरा. आता सर्व्ह करताना त्यावर किसलेले ओले खोबरे आणि कोथिंबीर टाका. सॉस बरोबर खायला द्या.