भरलेली सिमला ढब्बू मिरची
साहित्य:
५ ते ६ गोल आकारची ढब्बू सिमला मिरची आतून बिया काढलेली, हळद १/२ चमचा, तिखट २ चमचे, जिरे १ चमचा, मीठ चवीनुसार, धणेपूड, बेसन दीड वाटी, तेल ३ वाटी आवश्यकतेनुसार
कृती:
सिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्यातील बिया आणि देठ काढून घ्या. एका मोठ्या वाडग्यात बेसन घेऊन त्यात तिखट, हळद ,मीठ, धणेपूड आणि जिरे टाकून एकत्र करा.
सर्व मिश्रण एकत्र करत असताना त्यात थोडे थोडे तेल टाकून भिजवत रहा सैलसर झाले कि पोखरलेल्या मिरच्या घेऊन त्यात ते तयार वाटण पूर्णपणे भरून घ्या.
आता मंद आचेवर पसरट कढई ठेऊन त्यात २ पळ्या तेल टाकून वाटण भरून तयार केलेल्या मिरच्या त्यावर अलगद नीट अंतरावर ठेवा. झाकण ठेऊन वाफेवर शिजू द्या. अधेमधे झाकण काढून मिरच्या पालटत रहा म्हणजे व्यवस्थित शिजतील.






व्वाह,मस्त,खमंग
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete