खमंग खुसखुशीत गाजराचे सांडगे
*साग्रसंगीत जेवणासाठी -
1) उडीद आणि मुगाचे पापड
2) कुरडया
3) नागलीचे पापड
4) मुगोड्या
5) खारोड्या
6) धापोडे
* उपवासासाठी -
1) बटाट्याचे पापड
2) साबुदाण्याचे पापड
3) साबुदाण्याचे पळपापड
4)बटाट्याचे वेफर्स
* काही खास पदार्थ ज्यांच्याशिवाय मला तरी जेवण अपूर्ण वाटते विशेषतः खिचडी सोबत -
1) गाजराचे सांडगे
2) दह्यातील मिरच्या
3) मुळ्याच्या दह्यातील शेंगा
मग काय आणले गाजरं आणि केले सांडगे.
चला तुम्ही पण लागा यादी वाचून उन्हाळा Celebrate करण्याच्या तयारीला
साहित्य :
1 kg गाजरं, तिखट, मीठ चवीनुसार, हळद 2 चमचे, ओवा 2 चमचे, जिरेपूड, धणेपूड 3 चमचे, तीळ 3 मोठे चमचे, 1 वाटी कोथिंबीर
कृती :
गाजर किसून घ्या, त्यात वरील सर्व जिन्नस घालून मिक्स करा, हातावर थापून वड्या घाला. वड्या थापताना अतिरिक्त रस बाहेर पडून त्या बांधल्या जाऊन गोलाकार होतील. मग उन्हात खरपूस वाळवून घ्या.गरम तेलात तळून खिचडी सोबत खायला द्या.


Bakicya padharthanchi recepei dual ka plz
ReplyDeletenkkich pathvin agdi photoshit
ReplyDeleteMast aahe ,mi karun pahin.
ReplyDeleteThank you for visit
ReplyDeleteVery nice presentation. I like very much. Keep it up.God bless you 👌👌👌🌷🕭🐚🌷🐚🕭🌷🐚
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
DeleteNice Presentation. I like very much. God bless you. Keep it up. 🌷🕭🐚🌷🕭🐚🌷
ReplyDeleteThank you
ReplyDelete