तुमच्या सवडीने आणि अवश्य
वाचा नाहीतर एका
चांगल्या आणि चविष्ट
तसेच फळबागांनी सजलेल्या
ठिकाणाच्या माहितीला मुकल्याचे दुःख
अस्सल खवयाला नक्कीच
होईल😢
ही पोस्ट लिहायला जरा
उशीरच झाला म्हणा
त्याला कारणही तसेच होते,
काल खूप दिवसांनी
सर्व कुटुंबकबिल्यासह 👨👩👴👵👲आळंदीला जाण्याचा आणि त्यानिमित्ताने
बाहेर जेवण्याचा योग
जुळून आला. तर
पुण्याहून आळंदी कडे जातांना
आमचं लक्ष वेधल
गेलं ते " आनंदवन
गोखले मळा " या
फलकाकडे आणि त्याच्या
सभोवताली असणाऱ्या विविध प्रकारच्या
फळझाडांनी.🌴🌲🍂
जेवणाची वेळ साधारणपणे सकाळी ९ ते दुपारी ४ आणि संध्याकाळी ७ ते रात्री ९ अशी आहे. सुरवातीला आपल्या नजरेस पडतो
तो इथला कुपन
काउंटर तिथे गेल्यावर
माणशी 230 ते 250 रुपये एका
ताटाप्रमाणे आपल्याला कुपन घ्यावे
लागतात. इथे दर
दिवशीचा जेवणाचा मेनू वेगळा
असतो, स्वतंत्र मेनूकार्ड
देत नाहीत. आणि
जेवणाची व्यवस्था पंगतीप्रमाणे केली
आहे. म्हणजे वाढपी
येऊन ताट वाढतात.🍱🍛
आत प्रवेश केल्यावर आपल्या
स्वागताला उत्सुक असणारी बदकांची
फॅमिली🐤🐥
नजरेत भरते त्यातच
भर म्हणून पेरुच्या
झाडांची फांद्या एकात एक
गुंतून तयार झालेली
कमान आपले डोक्यावर
पाने पाडत 🍂 स्वागत करते.
आतमध्ये गेल्यावर उजवीकडे जेवणाचा
चारही बाजूंनी उघडा
पण वरून पत्री
शेड असणारा हॉल
दिसून येतो. त्याच्यासमोर
असणारे तुळशीवृंदावन आणि छान
छोटीसी रंगीत रांगोळी आपले
मन प्रसन्न करते.
हॉलच्या बरोबर समोर विस्तीर्ण
असा पसरलेला मळा
दिसतो. त्यात पेरू, आंबा,
चिक्कू आणि केळीची
बाग आहे. पेरूच्या
वेड्यावाकड्या आणि जमिनीपासून
कमी उंच असणाऱ्या
फांद्या बघितल्या की पाय
आपसूकच तिकडे वळतात. त्याला
बांधलेले झुले आणि
टायरच्या झोक्यांकडे मन धावू
लागते मग आपण
मनाच्या हिंदोळ्यावर झुला घेण्याचा
प्रयत्न करतो.येथे
झाडांखाली जुन्या आठवणींना उजाळा
देणाऱ्या नवारच्या आणि नारळाच्या
काथ्यापासून तयार केलेल्या
बाजी किंवा खाटा
बघितल्या की खाल्ल्यावर
मस्त ताणून देण्याची
😴इच्छा
न झाली तर
नवलच.
अरे हो जेवणाबद्दल
सांगायचेच राहिले तर रविवार
असल्यामुळे जेवणाच्या ताटात सुरवातीला
गरम ज्वारीची चुलीवरची
भाकरी आणि त्यावर
मोठ्ठा लोण्याचा गोळा 😌 वाढण्यात आला. उजव्या
बाजूस झणझणीत वांगे
बटाट्याची मसालेदार भाजी 😍, मटकीची तर्रीदार उसळ😋, पिवळीधम्म
कढी🤗,
आणि गोडूले गुलाबजाम
😇 देण्यात
आले होते. तर
डाव्या बाजूला तोंडी लावायला
शेंगदाणे आणि लाल
मिरची ची ओली
चटणी व किसलेल्या
लिंबाचे आंबटगोड लोणचे 😉 विविध प्रकारचे पापड,
पालकाचे हिरवेगार भजे 😚 आणि कांद्याचे
काप व लिंबाची
चतकोर फोड वाढण्यात
आली, आणि श्रीकृष्णाने
वर्णन केल्याप्रमाणे मिठाच्या
वाढणीने सर्व जेवणाला
स्वर्गीय चव
आली. जेवण्याची सांगता
गरमागरम खिचडीने झाली 😊
लिहिण्याच्या
sorry टायपिंग च्या नादात
पहिल्यांदाच इतकं मोठं
लिखाण झाले त्याबद्दल
क्षमा असावी 🙏
आणि हो अजून
एक खास आपल्या
सर्वांसाठी फोटो स्वतः
काढून इथे टाकण्यात
आले आहे म्हणून
माझे नाव संक्षिप्त
रुपात लिहिले आहे
याची नोंद घ्यावी.
चला मग कळवा
आपला अनुभव "आनंदवन
गोखले मळ्याचा" धन्यवाद.
पत्ता फोटोमध्ये दिला
आहे.











No comments:
Post a Comment