Colourful & Nutty Fruit Custard -
साहित्य :
१ मध्यम आकाराचे डाळिंब,
१ सफरचंद, २
केळी, ५ काळे अंगुर, ५ हिरवे अंगुर,
३
मोठे चमचे कस्टर्ड
पावडर, १/२
लिटर दुध, १
वाटी साखर बारीक
करून, बदाम
काप १/२ वाटी, १/२ वाटी काजू
काप
कृती :
प्रथम एका पातेल्यात
दूध घेऊन चांगले
गरम करून घ्यावे,
मग एका वाटीत
कस्टर्ड पावडर घेऊन थोड्या
दुधात मिक्स करून
घ्यावी. पातेल्यात असणाऱ्या दुधात
साखर आणि वाटीत
तयार मिश्रण एकत्र
करून घ्यावे. आता
त्याला थोडासा दाटपणा येऊ
लागेल हे मिश्रण
सतत ढवळत राहावे,
म्हणजे दुधाच्या गुठळ्या होणार
नाही.
साधारण दाटपणा आला की
मिश्रण खाली काढून
गार करून घ्यावे.
एका मोठया वाडग्यात सफरचंद,
केळी यांचे
काप, डाळींबाचे दाणे
आवडीनुसार घ्या,
मग थंड तयार
कस्टर्ड चे दूध
घेऊन त्यात फळांचे
कापलेले तुकडे आणि बदाम
व काजूचे उभे
काप टाका, सजावटीसाठी
काळे आणि हिरवे
अंगुर अर्धे कापून
वरून टाका.




खूपच छान छान सजवून ठेवलं आहे मोबाईल मधूनच उचलून खाण्याची शुरु करु.कॉम्बिनेशन फ्रुट सॅलड च खूप सुंदर आहे. 🌲🙋🌲🙋🌲🕭🐚🕭🐚
ReplyDeleteOh Thank you so much for your encouraging words.
ReplyDelete