लसणाचे मिक्स लोणचे
साहित्य:
मोठ्या पाकळीचा लसूण १ पाव, तेल २ वाटी, तुमच्या आवडीचा तयार लोणचे मसाला ५० ग्राम, आवश्यकतेनुसार मीठ, २ वाट्या कोणतेही मिक्स लोणचे.
कृती:
मोठ्या पाकळीचा लसूण सोलून घ्या. कढईत तेल गरम करून थंड करून घ्या. वाडग्यात लसूण आणि तयार लोणचे मसाला एकत्र करा आवश्यकतेनुसार मीठ टाका नंतर थंड झालेले तेल टाकून लोणचे एकत्र मिक्स करा. तुमच्या आवडीनुसार त्यात तुम्ही मिक्स लोणचे टाका. लसुणाच्या लोणच्याची चव जिभेवर चांगली रेंगाळते.
टीप :
कोणत्याही प्रकारचे लोणचे घालतांना त्यात जर तेल जास्त असले तर खूप दिवस टिकते.

👍👍👍
ReplyDelete🙏
ReplyDelete