मिक्स पिठाच्या चकोल्या
साहित्य:
२ वाटी गव्हाचं पीठ, १/२ वाटी बेसन पीठ, १ वाटी मिश्र धान्य पीठ, १/२ चमचा हळद, तिखट आवडीनुसार, आलं लसूण पेस्ट १ चमचा, साखर आणि मीठ चवीनुसार, तेलाचं मोहन २ चमचे, २ चमचे तीळ, १ चमचा जिरे, १/२ चमचा ओवा, १/२ चमचा हिंग, आणि पाणी आवश्यकतेनुसार.
कृती:
कणिक, बेसन आणि मिश्र पिठात तिखट,हळद, जिरे,ओवा, तीळ, आलं लसूण पेस्ट, हिंग,मीठ आणि तेलाचं मोहन घालून घट्ट भिजवून घ्यावे. नंतर लांब लांब दोरीप्रमाणे ताणून तुकडे कापावे आणि आवडीचा आकार द्यावा. १० मिनिटे शिटी न लावता कुकरमध्ये वाफवून घ्यावे. मग तुरीच्या वरणाला खमंग फोडणी देऊन छान उकली आली कि त्यात तुकडे सोडावे. अंदाजे २० मिनिटानंतर वरणात शिजल्यावर गरम गरम चिकोल्या सर्व्ह कराव्या. वरून सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
टीप:
कुकरमध्ये चिकोल्या वाफवल्यामुळे त्या आतून पूर्णपणे शिजायला मदत होते आणि वरणात सोडल्या तरी शिजताना एकमेकींना चिकटत नाही.

No comments:
Post a Comment