Without Bake Short Carrot Cake With Rich Dry-fruits
(गाजराच्या गोड वड्या )
साहित्य :
१/२ kg लाल गाजर, तूप २ चमचे, वेलची पूड २ छोटे चमचे, काजू आणि बदाम चे काप १/२ वाटी, साखर २ वाटी, दूध १ कप
कृती:
प्रथम गाजर धूऊन पुसून घ्या. मग त्याचा किस करून घ्या. मोठ्या कढईत तूप टाकून गरम चांगले गरम झाले कि तो गाजराचा किस त्यात टाकून चांगला परता. साधारण ५ मिनिटांनी २ वाटी साखर घाला व सतत हलवा हलवत रहा. साखरेचा पाक सुटून आला कि त्यात दूध आणि वेलची पूड घाला. हे मिश्रण सतत हलवत रहा साधारण अर्ध्या तासाने गाजराच्या किसाचा रंग बदलेल आणि मिश्रणाचा घट्ट गोळा तयार होऊ लागेल तेव्हा ग्यास बंद करून गोळा ताटलीत काढून फ्रिज मध्ये थंड होण्यासाठी ठेवा. २ तासांनी हलवा बाहेर काढून तुमच्या आवडत्या आकाराच्या SHAPE मध्ये बदाम आणि काजू काप वरून टाकून सर्व्ह करा.

Wow very nice Heart Shape & nice presentation. God bless you. Keep it up. Go ahead. All the best wishes.
ReplyDeleteThanks for your encouraging words.
Delete