कलाकंद
१ लिटर फाटलेले दूध, आवडीनुसार साखर अंदाजे १ मोठी वाटी, वेलची पावडर १ चमचा,
कृती:
फाटलेले दूध एका मोठ्या भांड्यात घेऊन उकळू द्या, उकळत असताना त्यात साखरं टाका आणि एक मोठा डाव ठेवा. दूध उकळताना पाणी उडून जाईल आणि खाली घट्ट पदार्थ शिल्लक असेल तेव्हा फ्रायप्यान मध्ये काढून मंद आचेवर पाक सुटू द्या. रंग बदलल्यावर डिश मध्ये काढून थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर बदाम, काजू चे काप टाकून सर्व करा.
टीप
१) दूध उकळताना डाव किंवा बशी दुधाच्या भांड्यात टाकले कि दूध उतू जात नाही.

No comments:
Post a Comment