Monday, 12 February 2018

HOTEL STYLE Dum Aaloo chi Bhaji


आजकाल मुलांना तुला कोणती भाजी आवडते रे खायला ? अस विचारल तर खात्रीशीरपणे ८०% मूल बटाट्याची भाजी असच उत्तर देतील. माझ बाळ पण त्याला अपवाद नाही (बाळ म्हणजे लहान आणि मोठ {बाळाचे बाबा सुद्धा}) बर त्यात पण काहीना पातळ फोडींची, काहीना जाड आणि चौकोनी ,काहीना त्रिकोणी आकाराची चिरलेली भाजीची फोड़ आवडते. एक न अनेक नखरे.
हे झाल नुसत भाजी चिरण्याच आता अजुन सगळ्यांनाच साल असलेली भाजी आवडत नाही,मग त्यांच्यासाठी बिनसालाची कितीही समजावल तरि कारटी आइकणार आहेत थोडीच. 
तेच हॉटेलात गेलो आणि तिथली दम आलू ची भाजी खाल्ली की घरी आल्यावर पुनः तशीच भाजी घरी करून हवी असते . म्हणून मग काल हॉटेल सारखी भाजी घरी करण्याचा प्रयत्न केला . छान जमली भाजी म्हणून आज तुम्हा सगळ्यांसाठी  रेसिपी Share करत आहे . नक्की करून बघा मोठ्या आणि लहान दोन्ही बाळाना खुश करा .
फोटो :


साहित्य : 
१ पाव दम आलू (आकाराने छोटे बटाटे) ,३ चमचे तेल , २ मध्यम कांदे , १ टमाटर, ५ लसणाच्या पाकळ्या, ३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर १ वाटी , तिखट आवडीनुसार , हळद १ चमचा , आल १चमचा किसलेल, जीरे २ चमचा , गरम मसाला १ चमचा ,काजू ची पेस्ट ३ चमचे, थोड़स घट्ट क्रीम किंवा मलाई २ चमचा 

कृती :
प्रथम कुकर मधे बटाटे उकडून घ्या. तोपर्यंत कांदा ,आल, लसूण, मिरच्या,कोथिंबीर आणि टमाटर मिक्सर मधे बारीक वाटून घ्या. कढईत तेल गरम करुन मिक्सर मधे केलेले वाटण व्यस्थित परतुन घ्या.त्यात हळद,तिखट, गरम मसाला, जीरे, टाकून परता. उकडलेल्या बटाट्याच्या साली सोलुन कढईतील मिश्रणात टाकून परता, थोड़स गरम पाणी टाकून एक वाफ येऊ दया. शेवटी काजू ची पेस्ट टाकून भाजी शिजु दया आणि सर्व्ह करतांना थोड़ी मलाई टाका आणि कोथिम्बीर नी गार्निशिंग करा.
 तयार आहे तुमची स्वतः ची  HOTEL STYLE दम आलू ची भाजी.



No comments:

Post a Comment