Yummy & Saucy Square Cuts
रवा २ वाट्या, आंबट ताक ३ वाटी, मीठ चवीनुसार, १ मोठा कांदा, १ मोठा टमाटा, हिरवी मिरची ५ ते ६, तेल आवश्यकतेनुसार, तिखट, आमचूर पावडर, चाट मसाला, धणेपूड, जिरेपूड प्रत्येकी १ चमचा.
कृती:
एका मोठ्या भांड्यात रवा आणि आंबट ताक एकत्र करा. त्यात चवीनुसार मीठ आणि २ चमचे तेल टाका. हे मिश्रण १ ते २ तास झाकून ठेवा. कांदा, टमाटा व हिरव्या मिरच्या मिक्सर मधून बारीक करून घ्या.
तिखट, आमचूर पावडर, चाट मसाला, धणेपूड, जिरेपूड हे सर्व मसाले एका वाटीत मिक्स करून घ्या.
नॉन स्टिक तव्यावर किंचित तेल शिंपडून रव्याचे तयार बॅटर जाड उत्तप्याप्रमाणे टाका. वरून मिक्सर मध्ये बारीक केलेले कांदा, टमाटा आणि हिरव्या मिरचीचे वाटण चमच्याने थोडे पसरून घ्या वरून वाटीत तयार केलेले मसाल्यांचे मिश्रण भुरभुरा. सॉस गोलाकार टाका व ५ मिनिटे झाकण ठेऊन मंद आचेवर भाजून घ्या, ५ मिनिटानंतर झाकण काढून हलक्या हाताने उत्तपा पलटून दुसरी बाजू भाजून घ्या.
खरपूस भाजल्यानंतर त्याला ताटलीत काढून घेऊन थंड झाल्यावर सुरीने चौकनी काप करून चटणी अथवा सॉस बरोबर खायला द्या.



Easy and tasty
ReplyDeleteहो ताई खूप सोपी आहे जिजाजी ना आवडेल बघ करून
ReplyDeleteYummy easy and very testy. I will make sure. Nice presentation. God bless you.. 👍👍🎂🌷🍓🎂🍓🌳🎂
ReplyDeleteTHANK U MAM
Delete