झटपट मिरची लोणचे
- साहित्य :
१ पाव हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी मोहरीची डाळ, मीठ अंदाजानुसार, लिंबाचा रस १ वाटी, हिंग १ मोठा चमचा, मोहरी १/२ चमचा, तेल साधारण दीड वाटी.
- कृती :
हिरव्या मिरच्या चांगल्या धूऊन पुसून घ्या. त्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करा. वाडग्यात अंदाजे मीठ घेऊन त्यात ते तयार मिरचीचे तुकडे घाला. मग तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि मोहरीची डाळ टाका. तेल साधारणपणे कोमट झाले कि तयार तुकड्यांच्या मिश्रणावर हळूहळू टाका आणि हलक्या हाताने मिश्रण एकत्र करा. पूर्णपणे लोणचं गार झाल कि सर्वात शेवटी लिंबाचा रस टाकून लोणचं ह्लवा . तयार झाले झटपट मिरची चे लोणचे.
- टीप :
मिरचीच्या लोणच्यात तेल आणि मसाला गरम असताना लिंबाचा रस टाकू नये, तसे केले तर लोणचे नासण्याची शक्यता असते.

टीप्स चांगली दीलेली आहे. खूप छान तोंडाला पाणी सुटले. असे वाटलं की आताच्या आता बनवू.परंतु आता मी बिलकुल तिखट खात नाही. घरात सर्व पदार्थ होते God bless you. Keep it up.
ReplyDeleteThank you. Tip lihayala mazya aaini sangitle karn lonch ha najuk vishy aahe n.
ReplyDeleteMouth watering 👍
ReplyDeleteThank you tai
Delete