मँगो मिल्क शेक
साहित्य :
आंब्याचा रस १ वाटी, पिठी साखर आवश्यकतेनुसार, आंब्याच्या बारीक तुकडे केलेल्या फोडी १/२ वाटी, दूध ४ वाटी
कृती:आंब्याचा रस मिक्सरमध्ये पिठी साखरेसोबत चांगला मिक्स करून घ्या. नंतर Ice-Trey मध्ये थोडा रस आणि आंब्याच्या तयार बारीक फोडी टाकून त्यांचा Cube तयार करून घ्या. फ्रिज मध्ये Mango Cube set झाले कि मिक्सरमध्ये तयार केलेल्या रसात आवश्यकतेनुसार थंड दूध टाकून पुन्हा मिक्सरमध्ये चांगले फिरवून घ्या.
सर्व्ह करतांना काचेच्या ग्लास मध्ये खाली तयार Mango Cube टाकून वरून थंड मिल्क शेक टाका आणि आंब्याच्या फोडींनी डेकोरेट करून थंड थंड प्यायला द्या.

Yummy
ReplyDelete