टरबुजाचे थंडगार सरबत
साहित्य:
१ मध्यम आकाराचे टरबूज, १ चमचा काळीमिरेपूड, २ चमचे काळेमीठ, ३ चमचे शुगर सिरप, ३ पुदिन्यायाची पाने
कृती:
टरबूजाच्या साधारण फोडी करून घ्या. ज्युसर मधून त्यांचा रस काढा. सोबतच पुदिन्याची पाने मिक्सर मधून वाटून रस काढून त्यात मिक्स करून घ्या. आता चवीनुसार काळेमीठ, काळीमिरपूड आणि शुगर सिरप टाकून थंड करायला फ्रिज मध्ये ठेवा आणि गारगार सर्व्ह करा.
टीप:
हॅन्डजूसर ने रस काढताना बिया आपोआप वेगळ्या होतात. त्यामुळे फोडी कापून टाकल्या कि चालते.
टीप:
हॅन्डजूसर ने रस काढताना बिया आपोआप वेगळ्या होतात. त्यामुळे फोडी कापून टाकल्या कि चालते.


No comments:
Post a Comment