चिंचवणी ची रेसिपी
साहित्य:
बिया काढून सोलून घेतलेल्या १ वाटी चिंचा, तिखट १ चमचा, जिरे १ चमचा, गूळ २ वाटी अथवा आवडीनुसार, तेल फोडणीसाठी, धणेपूड १/२ चमचा, आवडीनुसार काळा व गरम मसाला. ७ ते ८ चारोळ्या, मीठ चवीनुसार, पाणी आवश्यकतेनुसार
कृती:
चिंचवणी करण्याच्या आदल्या रात्री सोललेल्या चिंचा पाण्यात भिजवून ठेवाव्यात. दुसर्या दिवशी सकाळी त्या चांगल्या पाण्यानी कोळून घ्याव्यात. कढईत तेलाची फोडणी करून त्यात जिरे तडतडल्यावर चिंचेचा कोळ टाकून आवश्यकतेनुसार पाणी, तिखट, मसाला,मीठ आणि गुळ टाकून उकळू द्या. १० ते १५ मिनिटे उकळल्यानंतर आच बंद करून वरून वरून चारोळी टाकून आवडत असल्यास थंड अथवा जेवताना कोमट सर्व्ह करा.
तुमची चिंचवणी तयार आहे.

No comments:
Post a Comment