सोल्याच्या कचोऱ्या


साहित्य: (सारणासाठी )
तुरीच्या ओल्या शेंगा १/२ kg , लसूण पाकळ्या ८ ते १०, जिरेपूड २ चमचे, धणेपूड २ चमचे, तिखट आवडीनुसार, हळद १ चमचा, मीठ चवीनुसार, १ मोठा कांदा
साहित्य: (पारीसाठी )
मैदा २ वाटी, जिरे २ चमचे, तेलाचे मोहन २ चमचे, मीठ १ चमचा,पाणी आवश्यकतेनुसार
कृती :
तुरीच्या शेंगाचे दाणे काढून वाफवून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा ,लसूण बारीक ठेचून घाला ,जिरेपूड, धणेपूड, तिखट,हळद , मीठ टाकून एक वाफ येऊ द्या. मग सर्व मिश्रण मिक्सर मध्ये हल्के हल्के वाटून घ्या. खूप कोरडे वाटल्यास गरम तेल टाका. हे वाटलेले मिश्रण एका ताटलीत काढून थंड होऊ द्या.
पारीसाठी मैद्यामध्ये जिरे, तेलाचं मोहन,मीठ टाकून घट्ट भिजऊन घ्या. १० मिनिटे तसेच झाकून ठेवा. त्याची छोटी पोळी लाटून त्यात तयार सारण भरा आणि पुरचुंडी बांधून हाताने हळूहळू दाब देत लाटा. कढईत तेल गरम करून खरपूस तळून गरमागरम खायला द्या.

👍👍
ReplyDelete,🙏
ReplyDelete