Tuesday, 13 February 2018

Heart Shape Smashed Green filling Potato Paratha

पराठे तर आपण तसे पण खातो परंतू त्याला जर थोड़ा ट्विस्ट दिला तर मिळणारा आनंद काही वेगळाच असतो। वैलेंटाइन दिन जवळ आल्याने ख़ास आपल्या प्रिय व्यक्ति साठी बनवा  Special Heart Shape Smashed Green filling Potato Paratha


साहित्य  : (पारीसाठी )
गव्हाच पीठ ३ वाटी, मीठ १ चमचा , जीरे १ चमचा ,ओवा १ चमचा , तेलाच मोहन २ चमचे

साहित्य : (सारण)
हिरवे मटर १ वाटी उकडून कुस्करलेले , बटाटे ३ मोठे उकडून कुस्करलेले, हिरवी कोथिंबीर १ वाटी, हिरव्या मिरच्या ६ ते १० बारीक चिरलेल्या, हिरवी कांद्याची पात १ वाटी, साधारण १ मोठा कांदा, फोडणीसाठी तेल २ मोठे चमचे, तिखट आवडीनुसार,हळद आल लसुन पेस्ट प्रत्येकी १ चमचा,

कृती :
प्रथम पारीसाठी पिठ घट्ट भिजवून घ्या।  नंतर कढईत तेल गर्म करुन त्यात कांदा ,आल लसणाची पेस्ट, हिरवी मिर्ची चे काप परतून घ्या, तिखट हळद घालून वरून कुस्करलेला बटाटा,मटर,कोथिंबीर आणि कांद्याची पात टाका। एक वाफ आणली की मिश्रण गार होऊ दया, मग कणकेची पारी लाटून त्यात गार झालेल्या सारणाचे छोटे गोळे भरून लाटून घ्या ,लाटताना बदामाचा आकार दया, मग तव्यावर शेकताना तेल अथवा लोणी सोडा आणि खरपुस भाजून चटनी बरोबर खायला दया.     

No comments:

Post a Comment