भोकराचे लोणचे
उन्हाळ्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात भोकराचे फळ बाजारात आलेले दिसून येतात बर्याच जणींनी ते बघितले असतील पण त्याचे लोणचे कसे घालायचे ते माहित नसते त्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा उपयोग होईल.
साहित्य:
१/२ किलो भोकरे, १ किलो किसलेली आंबट कैरी, तुमच्या आवडीचा लोणचे मसाला, मीठ १ पाव किंवा आवश्यकतेनुसार, फोडणीसाठी तेल आवशक्यतेनुसार
कृती:
भोकरे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी. दुसर्या दिवशी कोरड्या फडक्याने वरून स्वच्छ पुसून घावी. नंतर भोकरे मधून फोडून घेऊन त्यातील बी काढून टाकून आतून पुसून घ्यावी. आतला चिकट द्रव निघून जातो. आता कैरी किसून त्यात भोकराच्या फोडी एकत्र कराव्या. नंतर तुमच्या आवडीचा तयार लोणचे मसाला घेऊन त्यावर व्यस्थित पसरावा. सर्व लोणचे नीट एकत्र करावे आवश्यकतेनुसार मीठ चव घेत घेत टाकावे. शेवटी तेल चांगले गरम करून थंड झाल्यावर लोणच्यावर टाकून मिक्स करावे.
खाण्यासाठी तयार आहे भोकराचे चविष्ट लोणचे.
टीप:
भोकराचे लोणचे शक्यतो कैरीसोबतच एकत्र करावे म्हणजे त्यातील चिकटपणा कमी होतो.


No comments:
Post a Comment