Sunday, 11 February 2018

Tambul chi Recipe




जेवण झाल्यानंतर मुखशुद्धी तर झालीच पाहिजे, म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होते.

काहींना बडीशोप खायला आवडते, तर काहींना सुपारी, मिठी सुपारी, तर काही पानांचे शौकिन असतात.

मला मात्र पानाचे सगळे जिन्नस एकत्र करून तयार केलेला तांबुल आवडतो. आमच्या कडे सणावाराला पानांचा तांबुल केला जातो.

माझ्यासारख्या तांबुल शौकीनांसाठी आज तांबुल ची रेसिपी

साहित्य :
             चांगली कोवळी व ताजी ३० विड्याची ( खाऊची ) पाने, चुना 1 छोटा चमचा पाव वाटी मसाला सुपारी ( बिनसुपारीची ), २ चमचे गुलकंद,  ४ चमचे सुके खोबरे, पाव टीस्पून काथपूड, अर्धा चमचा वेलचीपूड, लवंगा ४-५, पाव वाटी बडीशोप, गुंजेचा पाला ( आवडत असल्यास ), २ चमचे साखर.

कृती : 
           सर्व साहित्याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी - जास्त करता येते. विड्याची पाने स्वच्छ पुसून बारीक चिरून घ्यावीत. मग मिक्सरमध्ये प्रथम लवंगा, साखर, बडीशोप, सुके खोबरे घालून बारीक करून, त्यात इतर साहित्य व चिरलेली पाने घालून बारीक करावे. विड्याच्या पानात घालण्यासारखे इतरही काही जिन्नस यात घालू शकता.

 टीप :
  हे तयार तांबूल जेवणानंतर खावयास दिल्यास विडा खालल्याचा आनंद घेता येतो व सणावारी इतर धावपळीमुळे विडे तयार करण्याचा वेळही वाचतो.

No comments:

Post a Comment