Wednesday, 28 February 2018

Kairichaa Methambaa

कैरीचा मेथांबा 

साहित्य :
३ आंबट कैऱ्या, २ चमचे मेथीदाणे, तेल २ चमचे, तिखट २ चमचे, पाणी आवश्यकतेनुसार, गुळ १ वाटी किसलेला. 

कृती:
कैऱ्या धूऊन पुसून घेऊन त्यांचे चौकोनी काप करावे. कोय काढून घ्यावी. तुम्हाला वाटल्यास कैरीचे वरचे साल सोलून घेऊ शकता. गूळ किसून घ्या, म्हणजे उकळताना पटकन विरघळेल. कढईत तेल टाकुन मेथीदाणे लालसर झाले कि कैरीच्या फोडी टाकून परतून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी टाका. उकळताना गूळ हळूहळू मिश्रणात टाका. १५ मिनिटे उकळल्यानंतर गुळाचा पाक सुटून कैरीच्या फोडी नरम होतील, तेव्हा तयार मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर वाडग्यात काढून घ्या. थंड झाल्यावर पोळी बरोबर खायला तयार आहे आंबट गोड मेथांबा.  







3 comments:

  1. Hi! Madhura How r u?.Nice Pickle. If you don't mind. Amhi na tyachat garam telat hing kutalele dhanetakato.varshbhar karaycha asel tar tel hi thodesa jast takato kari muralyavar khoopach chhan test lagata.Thepala mhanj tumhi Dhapate mahntat tyachya barobar khayache bhaji chi awshyakata namste.👌👍👌👍👌🌷

    ReplyDelete
    Replies
    1. me mst.Thank you. Brech divs zaale tumhi group vr nvta.me mis kel tumhala. Mazyaaghri jast hing naahi aawdt mhnun me nahi takt. aamhipn dhapatya brobr khato agdi pravasaat sobt neto.

      Delete
  2. वेळ मिळत नाही. कुठ काय कामा साठी तर कुणाला भेटायला आणि वयाच्या मानाने काम लवकर होत नाही जे काम दहा मिनिटात होते ते 1/2 तास किंवा त्याहूनही जास्त वेळ लागतो. ठीक आहे आवडत नसेल तर टाकता कामा नये. Journey मध्ये आम्ही सुद्धा घेतो. अगदी perfect method आहे. मला हे लोणचे खूप आवडते 👌👌👌👌God bless you. Keep it up.. होळी ची तुला शुभेच्छा.

    ReplyDelete