चिंचेचं गुळाम्बट लोणचं
- साहित्य:
बिया काढून सोललेली चिंच १ पाव, तिखट आवडीनुसार १ वाटी, मीठ चवीनुसार, गुळ १/२ kg ( जर गोड आवडत असेल तर प्रमाण वाढवू शकता ), आमचूर पावडर २ चमचे, चाट मसाला १ चमचा, पाणी आवश्यकतेनुसार.
- कृती:
प्रथम सोललेल्या चिंचा एका मोठ्या वाडग्यात घेऊन त्याला पाण्यानी थोडे ओले करा आणि आवश्यकतेनुसार मीठ टाका. कढईत गुळ आणि थोडे पाणी एकत्र कुणी गुळाचा साधारण पातळ पाक तयार करा त्याला उकळी आली कि त्यात चिंच, तिखट, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ टाकून चांगले उकळू द्या.
१० मिनिटे उकळल्यानंतर त्यात चाट मसाला टाकून आच बंद करा. झाकण ठेऊन चिंच पाकात मुरू द्या.
थंड झाले कि नुस्त बोटानी खायला तयार आहे चिंचेचे गुळाम्बट लोणचं.
- टीप:
- पाकातील लोणचं असल्यामुळे फ्रीज मध्ये न ठेवता वरती काचेच्या बरणीत ठेवलं तरी वर्षभर टिकत.
- पाक न करता पण तुम्ही चिंचेचं लोणचं वरील सर्व साहित्य किसलेल्या गुळाबरोबर मिक्स करून काचेच्या बरणीत भरून कडकडीत उन्हात १५ दिवस ठेऊन सुटलेल्या पाकात मुरू द्या छान अलग चव येते.

New item, must try recipe
ReplyDeleteThank you😀
ReplyDeletevery nice
ReplyDelete