आलू टिक्की (रगडा पॅटीस) ची रेसिपी
दोन दिवसांपूर्वी TV वर आलू टिक्की (रगडा पॅटीस) ची रेसिपी पाहिली सोपी वाटली म्हणून करून बघितली अगदी गाडीवरच्या भैईया ची जशी असते तशी जमली. आज आपल्या खादाड खाऊ group च्या मेंबर्स साठी मुद्दाम रेसिपी Share करत आहे.दुपारच्या नाश्त्याला नक्कीच करून बघा-
* साहित्य :
उकडून घेतलेले बटाटे 5 मोठे, ब्रेड क्रम्स चा चुरा 1 वाटी, आलं 1 चमचा, लसूण पेस्ट 1 चमचा, कांदा 2 मोठे बारीक चिरलेला, कोथिंबीर 1 वाटी, हिरव्या मिरच्या4 बारीक चिरलेली, चवीनुसार मीठ, 2 चमचे लिंबाचा रस, काबुली चणे 2 मोठी वाटी भिजवून उकडून घेतलेले. पुदिना आणि कोथिंबीर ची हिरवी चटणी, चिंच गूळ आणि खजूर ची चटणी

* कृती :
प्रथम उकडलेल्या बटाट्यात आलं, लसूण, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक चिरलेली, चवीनुसार मीठ, थोडा लिंबाचा रस टाकून एकत्र मिक्स करावे नंतर त्याची पॅटी घेऊन ब्रेड क्रम्स मधे घोळून तळायचे.
त्यावर काबुली चणे भिजवून उकडून छोल्यांपेक्षा जरा कमी मसालेदार ग्रेव्ही करुन घ्यायची. पॅटिसवर ही ग्रेव्ही, बारीक चिरलेला कांदा , टॉमेटॉ, चिंचेची चटणी, दही, पुदिना आणि कोथिंबीरची हिरवी चटणी आणि वरून थोडासा चाट मसाला भुरभुरायचा.

चिंचेच्या आंबट-गोड चटणी साठी समप्रमाणांत चिंच, खजूर, अन चिंचेच्या अर्धा गूळ ,चवीपुरत मीठ , थोडं तिखट , पाणी घालून उकळायचं १०-१२ मिनिटं. गार झालं की हँड ब्लेंडर ने एकजीव करून गाळून घ्यायचं. फ्रीझमधे १०-१५ दिवस आरामात टिकते .

Nice to see your first post of ragada pattice!!
ReplyDeleteWell done, keep it up!!!