Thursday, 15 February 2018

Saabudanyache Palpapad

साबुदाण्याचे  पळपापड 



साहित्य :
साबूदाणा  ४ वाटी, पाणी २ वाटी, जीरे २ चमचे, मीठ चवीनुसार, खाण्याचा रंग १/२ चमचा 

कृती :
प्रथम ४ वाटी साबूदाणा २ वाटी पाण्यात रात्रभर भिजवून ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी साबूदाणा  चांगला फुगुन मऊ झालेला असेल. नंतर गैसवर साधारणपणे साबूदाण्याच्या दुप्पट पाणी पातेल्यात घेऊन उकळायला लागल की त्यात भिजवलेला साबूदाणा  सोडावा. नंतर जिरे,मीठ आणि खायचा रंग टाकावा. मिश्रण सतत ढवळावे नाहीतर पातेल्याला साबुदाणा लागायची भीती असते. थोड्याच वेळासाबुदाणा शिजून घट्ट होऊ लागेल. तेव्हा मिश्रण खाली काढून घ्या आणि गरम असतानाच पळीने वाळवणाच्या मेनकापडावर(जाड प्लास्टिकवर) थोड्या थोड्या प्रमाणात टाकून उन्हात सुकू द्या. साधारण वाळले कि बाजू पलटून पुन्हा सुकू द्या. 
तळताना पापडी चांगली फुलते. उपासाच्या चिवड्यात पण कुस्करून टाकता येते.   

टीप :
१) मिश्रणात जिरे टाकले असता पापड्यांचा रंग पिवळा होईल. 
२) शिजवलेले साबुदाण्याचे मिश्रण जर गार झाले तर त्यात उकळलेले गरम पाणी टाकून पुन्हा थोडे शिजू द्या. 






2 comments:

  1. Wow!!!very nice step by step systematic shows the method. Nice presentation. God bless you. Keep it up. My all the best wishes to you always. 🌷🍰🌷🙋👌👌👌

    ReplyDelete