Spicy Green Chillies With Yogurt Filling
दह्यातील उन्हाळी मसाला मिरच्या

साहित्य:
लांबीने मोठ्या व थोड्या जाड तिखट मिरच्या १ पाव, अगदी घट्ट दही गोळा, धणेपूड २ चमचे, जिरेपूड २ चमचे, चिमूटभर हळद आणि आमचूर पावडर, ३ चमचे लिंबाचा रस,
कृती:
प्रथम मिरच्या स्वच्छ धुऊन पुसून घ्या. मग त्या मधोमध पोट फाडून चिरून घ्या. आतील बिया काढण्याची गरज नाही. नंतर एका वाटीत घट्ट दही गोळा ज्यात अजिबात पाणी नसेल अश्या रीतीने घ्यावा. त्यावर धणेपूड, जिरेपूड, हळद, आमचूर पावडर आणि लिंबाचा रस टाकून व्यवस्तिथ मिक्स करून घेऊन ते मिश्रण आता पोट फाडलेल्या मिर्च्यांमध्ये अगदी पुरेपूर भरून घ्या तसेच वरून देखील थोडेसे आवरण म्हणून हलके लावा.
चांगल्या कडक उन्हात पूर्ण १५ दिवस खणंग वाळल्यानंतर गरमागरम खिचडी आणि कढी बरोबर खायला द्या.


This comment has been removed by the author.
ReplyDeleteYummy
ReplyDeleteYummy
ReplyDeletethanku
Deleteदही मुळे वास येत नाही का?सूखल्या वर डब्यात भरून ठेवायची रहाते का? लगेच वापरून घ्यावीत. प्लीज कळवा. खूप छान पण आता तिखट मिरची खात नाही.
ReplyDeletenahi yet jast vas kdk unhat sukvlyawr air tight dbyaat brl ki vrshbhr changlyaa rahtat.
DeleteTo fry karun gyaychi na?
ReplyDeleteho
Delete